
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले वचन पूर्ण केले असून, लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या टप्प्यात, २१०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यांमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) मार्फत जमा होत आहे.
२.४० कोटी महिलांना लाभाचा दावा
या योजनेसाठी महाराष्ट्रातील जवळपास २.४० कोटी महिला पात्र असून, सुरुवातीच्या टप्प्यात २५ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. काल रविवार असूनही सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि रात्रीपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली.
सुरुवातीच्या १० जिल्ह्यांची यादी
पहिल्या टप्प्यात खालील १० जिल्ह्यांतील महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे:
- सिंधुदुर्ग
- हिंगोली
- गडचिरोली
- वाशिम
- भंडारा
- वर्धा
- गोंदिया
- रत्नागिरी
- नंदुरबार
- धाराशिव
उर्वरित जिल्ह्यांसाठी लवकरच लाभ
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी १० जिल्ह्यांमध्ये हा हप्ता पोहोचला आहे. उर्वरित जिल्ह्यांतील महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाईल. उद्या आणखी १० जिल्ह्यांची नावे जाहीर होतील.
महिलांसाठी वाढीव रक्कमेची घोषणा
मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे वचन दिले होते. भविष्यात ही रक्कम ३,००० रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. सध्या मात्र डिसेंबरचा हप्ता जमा करण्यात आला आहे.
अन्नपूर्णा योजनेचा फायदा
लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येत आहेत. यासाठी महिलांनी गॅस कनेक्शन आपल्या नावावर करणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस एजन्सीकडे जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
महिलांसाठी इतर योजनांचा लाभ
लाडकी बहीण योजना ही फक्त सुरुवात आहे. महिलांसाठी इतर योजनाही आहेत जसे की:
- मोफत सायकल योजना
- शिलाई मशीन
- ब्युटी पार्लर ट्रेनिंग
- विश्वकर्मा योजनेतून विविध वस्तू
महिला बांधवांनी माहिती शेअर करावी
महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकृत माहितीसाठी सजग राहावे. तसेच, माहिती आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअॅप व फेसबुकवर शेअर करावी.